Anuradha Vipat
मासिक पाळीच्या काळात वजन वाढल्यासारखे वाटणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे.
बहुतांश महिलांचे वजन या काळात १ ते २.५ किलोपर्यंत वाढू शकते परंतु घाबरण्याचे कारण नाही, कारण हे वजन तात्पुरते असते.
पाळी येण्यापूर्वी शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये बदल होतात. यामुळे शरीरात पाणी साठून राहते.
पचनसंस्थेतील बदलांमुळे गॅस होणे किंवा पोट जड वाटणे यालाच अनेकजण वजन वाढणे समजतात.
या काळात गोड किंवा खारट पदार्थ खाण्याची इच्छा तीव्र होते. जास्त मीठ किंवा साखर खाल्ल्याने शरीरात पुन्हा पाणी साठते.
शरीरात मॅग्नेशियम कमी झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी खाली येते, परिणामी भूक जास्त लागते.
पोटदुखी किंवा थकव्यामुळे या दिवसात हालचाल कमी होते, ज्यामुळे शरीर सुस्तावते.