Anuradha Vipat
तोंडली ही दिसायला जरी साधी भाजी असली, तरी आरोग्यासाठी ती एखाद्या 'सुपरफूड'पेक्षा कमी नाही.
तोंडलीमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात.
यात फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि पचन संस्था सुरळीत राहते.
तोंडलीमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि चयापचय वेगवान करण्याची क्षमता असते.
यातील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते.
यात असलेल्या लोह मुळे शरीरातील अशक्तपणा आणि थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते.
व्हिटॅमिन 'सी' आणि 'ए' मुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची शक्ती वाढते.