Swarali Pawar
पावसानंतर कपाशीमध्ये तणांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. योग्य वेळी योग्य तणनाशक वापरल्यास तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.
लागवडीनंतर ४८ ते ७२ तासांच्या आत उगवणपूर्व तणनाशकाची फवारणी करा. यामुळे तण उगवण्यापूर्वीच त्यांचे नियंत्रण करता येते.
पेंडीमेथिलीन ३०% एकरी १ लिटर किंवा पेंडीमेथिलीन ३८.७% एकरी ७०० मि.ली. वापरा. शिफारशीनुसार पाण्यात मिसळूनच फवारणी करावी.न
कपाशी उगवल्यानंतर उगवणपश्चात तणनाशकाची फवारणी करता येते. मात्र तणांचा प्रकार ओळखून तणनाशकाची निवड करावी.
उभ्या पानाच्या तणांसाठी क्विझेलोफॉप वापरा. गोल पानांच्या तणांसाठी पायरीथियोबॅक सोडियम उपयुक्त ठरते.
पायरीथियोबॅक सोडियम ६% + क्विझेलोफॉप इथाईल ४% हे संयुक्त तणनाशक वापरता येते. यामुळे एकदल आणि द्विदल अशा दोन्ही तणांचे नियंत्रण होते.
लागवडीनंतर १५ ते २१ दिवसांनी किंवा तणांना २-३ पाने आल्यावर फवारणी करा. एकरी ४२५ मि.ली. तणनाशक २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
लागवडीवेळी खतांचा बेसल डोस द्यायला विसरू नका. वेळेवर निंदणी, विरळणी आणि आंतरमशागत केल्यास कपाशीची वाढ अधिक चांगली होते.