Swarali Pawar
पावसाला उशीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत. अशावेळी योग्य पीक आणि वाण निवडल्यास उत्पादनातील जोखीम कमी करता येते.
पेरणीला जास्त उशीर झाला असेल तर मूग, उडीद आणि भुईमूग टाळा. या पिकांची उशिरा पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट येऊ शकते.
कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, ज्वारी, तीळ आणि सूर्यफूल यांची निवड करा. ही पिके उशिरा पेरणीसाठी तुलनेने अधिक योग्य ठरतात.
सोयाबीन + तूर, बाजरी + तूर किंवा कपाशी + तूर अशी आंतरपीक पद्धत वापरा. यामुळे हवामानातील जोखीम कमी होऊन उत्पादनाला आधार मिळतो.
भारी जमिनीत कापूस, तूर आणि सोयाबीन चांगले येतात. हलकी जमीन असेल तर बाजरी, तीळ, कारळ आणि एरंडीला प्राधान्य द्या.
कोरडवाहू शेतीसाठी कमी कालावधीचे वाण निवडा. सिंचनाची सोय असल्यास मध्यम किंवा जास्त कालावधीचे वाण घेता येतात.
सोयाबीनसाठी जेएस-९३०५, जेएस-३३५ आणि फुले दुर्वा उपयुक्त आहेत. कपाशीचे केए-७, एकेए-८, एकेए-२०१३-८, फुले धन्वंतरी आणि पीए-२५५. तर तुरीसाठी प्रगती, फुले राजेश्वरी, गोदावरी, आशा आणि पीकेव्ही तारा चांगले पर्याय आहेत.
तुरीची पेरणी जितकी उशिरा होईल तितके ओळींमधील अंतर कमी ठेवा. यामुळे योग्य रोपसंख्या राखून उत्पादनातील घट कमी करता येते.