Anuradha Vipat
लग्नाचा सीझन म्हणजे धावपळ, खरेदी आणि सततचे कार्यक्रम! अशा वेळी धावपळीमुळे चेहऱ्याचा ग्लो कमी होतो .
जर तुम्हाला कोणत्याही लग्नासाठी किंवा कार्यक्रमासाठी अवघ्या १५ ते २० मिनिटांत सोन्यासारखा निखार हवा असेल, तर गोल्ड पील-ऑफ मास्क हा एक सर्वोत्तम आणि झटपट पर्याय आहे.
हा मास्क काढल्यानंतर चेहऱ्यावरील टॅनिंग आणि थकवा दूर होऊन चेहरा लगेच चमकू लागतो.
पील-ऑफ मास्क त्वचेवरील डेड स्किन सेल्स आणि ब्लॅकहेड्स/व्हाइटहेड्स सहज ओढून काढतो.
गोल्ड मास्कमुळे त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा तरुण आणि घट्ट दिसते.
हा मास्क चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि घाण शोषून घेतो, ज्यामुळे चेहरा फ्रेश दिसतो
बाजारात मिळणाऱ्या मास्कमध्ये काही केमिकल्स असू शकतात, त्यामुळे पहिल्यांदा वापरताना हातावर किंवा कानाच्या मागे लावून पॅच टेस्ट नक्की करा.