Anuradha Vipat
आपण सामान्यतः लिंबाचा रस काढून झाल्यावर त्याची साले कचऱ्यात फेकून देतो.
लिंबाच्या रसापेक्षाही त्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन-सी, अँटीऑक्सिडंट्स आणि सायट्रिक ऍसिडचे प्रमाण अधिक असते.
हे घटक त्वचेवरील काळे डाग, टॅनिंग दूर करून त्वचा उजळण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात.
२ चमचे लिंबाच्या सालीची पावडर, १ चमचा मध आणि १ चमचा दही एकत्र करून पेस्ट बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
लिंबाची साल एक उत्तम 'नॅचरल स्क्रब' आणि ब्लीचिंग एजंट म्हणून काम करते. यामुळे मृत त्वचा सहज निघून जाते.
जर तुम्हाला पावडर बनवायला वेळ नसेल, तर तुम्ही ताजी सालही वापरू शकता. यामुळे त्वचेला ताजेतवाने वाटते.
लिंबामध्ये सायट्रिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी हाताच्या त्वचेवर पॅच टेस्ट नक्की करा.