Anuradha Vipat
आपण सामान्यतः कलिंगड खाताना त्याच्या बिया फेकून देतो, पण या बिया पोषक तत्वांचा प्रचंड मोठा स्त्रोत आहेत.
प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असलेल्या या बियांचे नियमित सेवन केल्याने हृदय आरोग्य सुधारण्यासोबतच प्रतिकारशक्ती देखील वाढते.
कलिंगडाच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते. हे खनिज हृदयाचे ठोके नियमित ठेवण्यास आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
वारंवार आजारी पडणाऱ्या लोकांसाठी या बिया वरदान आहेत. यातील 'झिंक' आणि विटामिन-बी मुळे शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते
त्वचेवर अकाली सुरकुत्या येणे थांबवण्यासाठी कलिंगडाच्या बिया फायदेशीर ठरतात.
कलिंगडाच्या बियांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अति खाणे टळते आणि वजन नियंत्रित राहते.