Anuradha Vipat
पित्ताचा त्रास अचानक उद्भवल्यास छातीत जळजळ, पोटात आग आणि आंबट ढेकर येणे यांसारख्या समस्या सुरू होतात.
औषधांशिवाय स्वयंपाकघरातील काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही हा त्रास झटपट थांबवू शकता.
थंड दूध पोटात जाताच तेथील ॲसिड न्यूट्रलाइज करते. दुधातील कॅल्शियम पोटात अतिरिक्त ॲसिड तयार होण्यापासून रोखते.
पाणी पोटात साठलेले ॲसिड पातळ करते, तर खडीसाखर शरीराला थंडावा देऊन जळजळ थांबवते.
जिरे आणि बडीशेपमध्ये पाचक गुणधर्म असतात, जे लाळ ग्रंथींना उत्तेजित करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस व ॲसिडिटीपासून त्वरित आराम मिळतो.
आयुर्वेदामध्ये मनुके आणि गुलकंद हे पित्तशामक मानले जातात. हे पोटातील उष्णता पूर्णपणे शांत करतात.