Anuradha Vipat
वॉटर फास्टिंग केल्याने वजन झटपट कमी झाल्यासारखे वाटू शकते परंतु हे प्रामुख्याने शरीरातील पाण्याचे वजन असते चरबी नसते.
अन्नाचे सेवन पूर्णपणे बंद केल्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत.
शरीर ऊर्जेसाठी चरबीसोबतच स्नायूंचा वापर करू लागते, ज्यामुळे अशक्तपणा येतो.
यामुळे चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी, डिहायड्रेशन आणि रक्तातील साखर अचानक कमी होणे असे गंभीर त्रास होऊ शकतात.
उपवास सोडल्यानंतर वजन पुन्हा वेगाने वाढण्याची शक्यता जास्त असते.
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम हे सर्वात सुरक्षित मार्ग आहेत.
वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा किंवा प्रमाणित आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.