Anuradha Vipat
जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल, तर 'केळं' हे एक फळ तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतं.
अनेकदा लोक रात्री फळ खाणं टाळतात, पण झोपेच्या समस्येसाठी केळं अत्यंत गुणकारी आहे.
केळ्यामधील घटक तुमच्या शरीरातील थकलेल्या स्नायूंना रिलॅक्सकरतात, ज्यामुळे शरीर झोपेसाठी तयार होते.
केळ्यामध्ये 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो ऍसिड असते. हे मेंदूला शांत करून झोप येण्यास मदत करतात.
रात्री भूक लागली तर जड अन्न खाण्यापेक्षा केळं खाणं चांगलं असतं.
केळं हे पचायला सोपे असते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून रात्री अचानक जाग येण्यापासून रोखते.
केळ्यातील व्हिटॅमिन B6 तणाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे मानसिक शांतता लाभते.