Team Agrowon
मका हे जलद वाढणारे, पालेदार, सकस, रुचकर, अधिक उत्पादनक्षम, पौष्टिक तसेच भरपूर शर्करायुक्त पदार्थ असणारे चारा पीक आहे. उत्तम दर्जाचा मुरघासही तयार करता येतो. हिरव्या चाऱ्यात ९ ते ११ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.
लागवडीसाठी जमीन सुपीक, कसदार व निचरायुक्त निवडावी. एक नांगरट व कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वमशागतीच्या वेळी जमिनीत हेक्टरी ५ टन शेणखत मिसळावे.
आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-२, विजय या जातींची निवड करावी. हेक्टरी ७५ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम अॅझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीज प्रकिया करावी.
जून-जुलै महिन्यात पाभरीने ३० सेंमी अंतरावर पेरणी करावी. प्रति हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. यापैकी ५० किलो नत्र, ५० किलो
पन्नास टक्के पीक फुलोऱ्यात (पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी) असताना कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्टरी ५०० ते ६०० क्विंटल उत्पादन मिळते.
आहारात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास उत्तम खुराक देऊनसुद्धा उत्पादनक्षम वय आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. दर्जेदार हिरव्या चारा अभावी कमजोर वासरे जन्मतात.
आहारात जास्त प्रमाणात खुराक व कमी प्रमाणात हिरवा चारा असे प्रमाणे जास्त काळ राहिल्यास पचन संस्थेवर विपरीत परिणाम होतो.