Anuradha Vipat
आपले शरीर आजारी पडण्यापूर्वी किंवा शरीरात काही गंभीर बिघाड होण्यापूर्वी वेगवेगळ्या लक्षणांद्वारे आपल्याला पूर्वकल्पना देत असते.
पुरेशी झोप घेऊनही सतत थकवा जाणवत असेल, तर हे रक्तातील साखरेचे प्रमाण बिघडणे , थायरॉईड किंवा रक्ताल्पता असण्याचे लक्षण असू शकते.
अचानक वजन वेगाने कमी होणे किंवा वाढणे हे हार्मोनल असंतुलन, पचनसंस्थेचे आजार किंवा थायरॉईडचे मुख्य संकेत आहेत.
शरीराला झालेली छोटी जखम भरून येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
वारंवार किंवा सतत तीव्र डोकेदुखी होणे हे उच्च रक्तदाब , डोळ्यांचे विकार किंवा मायग्रेनचे संकेत असू शकतात.
शरीरावर अचानक नवीन तीळ येणे किंवा जुन्या तिळाचा आकार, रंग वेगाने बदलणे हे त्वचेच्या गंभीर संसर्गाचे संकेत असू शकतात.
वारंवार छातीत जळजळ होणे ही फक्त ॲसिडिटी नसून काही वेळा ते हृदयविकाराशी संबंधित धोक्याचे संकेत असू शकतात.