Anuradha Vipat
झोपेत असताना अचानक पूर्ण शरीराला किंवा हाता-पायाला तीव्र झटका बसून डोळे उघडण्याच्या क्रियेला वैद्यकीय भाषेत 'स्लीप स्टार्ट्स' असे म्हणतात.
'स्लीप स्टार्ट्स' हा कोणताही गंभीर आजार नसून एक सामान्य शारीरिक प्रक्रिया आहे.
जेव्हा आपण झोपेच्या पहिल्या टप्प्यात असतो, तेव्हा शरीराचे स्नायू हळूहळू शिथिल होऊ लागतात.
या प्रक्रियेत मेंदूचा काही भाग स्नायूंची ही शिथिलता 'आपण कुठेतरी वरून खाली पडत आहोत' अशी समजतो.
स्वतःचा बचाव करण्यासाठी मेंदू स्नायूंना अचानक हालचालीचा संदेश देतो, ज्यामुळे झटका बसतो.
जर तुम्ही दिवसभर खूप जास्त मानसिक दबावाखाली किंवा चिंतेत असाल, तर रात्री झोपताना मेंदू पूर्णपणे शांत होत नाही.
सतत झोप पूर्ण न झाल्यामुळे मेंदू आणि शरीराचा ताळमेळ बिघडतो, ज्यामुळे रात्री असे झटके जाणवतात.