Mahesh Gaikwad
सकाळी-सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. पाहूयात याचीच माहिती.
सकाळी कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीरात विषारी पदार्थ पडतात. यामुळे शरीर डिटॉक्स होते.
रिकाम्या पोटी पोटी कोमट पाणी पिल्याने शरीरातील ताण कमी होतो आणि तुम्हाला हलके व चांगले वाटते.
सकाळी एक ग्लास कोमट पाणी रिकाम्या पोटी प्यायल्यामुळे पोट स्वच्छ राहते आणि पचनक्रिया सुधारते.
कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराचे तापमान वाढते. परिणामी चयापचायची क्रिया वेगवान होते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी पटकन जळते.
सकाळी रिकाम्यापोटी एक ग्लास कोमट पाणी पिल्यामुळे बध्दकोष्ठता, अपचन आणि पोटातील गॅसची समस्या दूर होते.
दररोज नियमित रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. ज्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य सुधारते.
कोमट पाणी स्नायूंना रिलॅक्स करून सांधेदुखी कमी करण्यात मदत करते. ज्यामुळे वेदनांपासून आराम मिळतो.
घसा खवखवत असल्यास रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने घशाच्या खवखवीपासून आराम मिळतो.