Mahesh Gaikwad
केसांची नियमित काळजी न राखल्याने केसांच्या शेंड्यांना फाटे फुटतात. यालाच स्प्लिट एंड्स असे म्हणतात.
काही घरगुती उपाय करून केसांना फाटे फुटण्याची समस्या कमी करता येवू शकते. पाहूयात याचीच माहिती.
दररोज केसांच्या टोकांना खोबरेल तेलाने हलका मसाज करा. यामुळे केसांना नैसर्गिक ओलावा मिळतो.
केसांच्या स्प्लिट एंड्सला दही आणि मध एकत्र करून लावल्यास केस मऊ होतात आणि स्प्लिट एंड्स कमी होतात.
अंड्यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. अंडे, ऑलिव्ह ऑईल आणि मध एकत्र करून केसांच्या टोकांना लावल्यास केसांना मजबुती मिळते.
कोरफडीचा गर केसांच्या टोकांना लावल्यास ते नैसर्गिक कंडिशनरसारखे काम करते. तसेच यामुळे केसांना चमकही येते.
कोमट केलेल ऑलिव्ह ऑईल केसांच्या टोकांना लावून १ तास ठेवा. यामुळे स्प्लिट एंड्स हळूहळू कमी होतील.
केसांच्या स्प्लिट एंड्सची समस्या करण्यासाठी गरम ड्रायर व स्ट्रेटनर वापरणे टाळा. केसांना नियमित तेल लावा आणि ६-८ आठवड्यांनी केसांची ट्रिमिंग करा.