Mahesh Gaikwad
अक्रोडमध्ये विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे याला ब्रेनफूड असेही म्हणतात. जाणून घेवूयात त्याचे आरोग्यदायी फायदे.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचारशक्ती वाढते.
शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अक्रोड फायदेशीर आहेत. यामुळे ह्रदय विकाराचा धोका कमी होतो.
अक्रोडमध्ये अँटि-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन - ई आणि झिंक असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
अक्रोडमध्ये असणाऱ्या प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्समुळे दिवसभर शरीराची ऊर्जा टिकून राहते.
अक्रोडमध्ये असणारे कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम घटक हाडांसह दातांच्या मजबूतीसाठी लाभदायक असतात.
यामधील व्हिटामिन-ई आणि हेल्दी फॅट्समुळे त्वचा उजळते आणि केसही मजबूत होतात.
तसेच यामध्ये फायबर आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे दिर्घकाळापर्यंत भूक नियंत्रणात राहते.