Mahesh Gaikwad
बऱ्याचदा कामाच्या अतिताणामुळे मान दुखते. पण, सातत्याने मान दुखत असल्यास याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
सामान्यत: झोपतून उठल्यानंतर बऱ्याच जणांना मान अवघडणे, दुखण्याची समस्या होते. अनेकदा अशा मानेच्या दुखण्याकडे सामान्य दुखणे म्हणून पाहिले जाते.
परंतु ही सामान्य वाटणारी मानदुखी कधीकधी गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकते.
अवघडलेली मान किंवा मानेमध्ये होणारी तीव्र वेदना हे सर्वाइकल स्पॉन्डिलायटीसचे प्राथमिक लक्षण असू शकते.
सर्वाइकल स्पॉन्डिलायटीसची समस्या वाढत्या वयामुळे किंवा मकण्याच्या चुकीच्या पोश्चरमुळे (स्थिती) होते.
बऱ्याचदा मानेच्या दोन मणक्यातील चक्ती सरकते ज्याला स्लिप डिस्क म्हणतात. यामुळे खांदे आणि हाताच्या बोटांपर्यंत वेदना जाणवतात.
एकाच ठिकाणी एकाच स्थितीमध्ये जास्त वेळ बसून राहिल्यानेही मानेच्या स्नायूंवर ताण येतो.
ऑस्टियोआर्थरायटीससारख्या आजारांमुळेही सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होतात. जर तुम्हीही सततच्या मानदुखीने त्रस्त असाल, तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.