sandeep Shirguppe
ड्रायफ्रुटमधील महत्वाचा घटक असलेल्या अक्रोडचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, जे तुमचे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.
अक्रोड लोह, फॉस्फरस, तांबे, प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारखे पोषक घटक असतात.
अक्रोड भिजवून खाल्ल्याने कडू लागत नाही. अक्रोड खाण्याची योग्य वेळ सकाळी आहे.
अक्रोडात भरपूर फायबर असते, चयापचय वाढतो. त्यामुळे ते पोटासाठी फायदेशीर असते.
रक्तदाबाच्या रुग्णांनी अक्रोड जरूर खावे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते.
अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला चांगली झोप लागते. हे नैराश्य आणि चिंता दूर ठेवते.
अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करता.