sandeep Shirguppe
मखाना खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेक समस्यांपासून हे खाल्ल्याने सुटका होते.
मखानामध्ये खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस देखील भरपूर आहेत.
मधुमेह नियंत्रीत ठेवण्यासाठी मखानाचे सेवन केले पाहिजे. यात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते.
पोटाचे आजार आणि पचन सुधारण्यासाठी मखाना खाणे योग्य ठरेल.
दुधात मखाना उकळून त्याचे सेवन केल्यास हाडे आणि स्नायू मजबूत होतात.
आहारात मखानाचा समावेश केल्यास वृद्धत्वाची लक्षणे दूर होतात.
केस, त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यासाठी मखाना खायला हवे.
वजन कमी करण्यातही मखाना महत्त्वाची भूमिका बजावते.