Anuradha Vipat
निरोगी राहण्यासाठी सकाळी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. आज आपण सकाळी चालताना कोणत्या चुका टाळाव्यात हे पाहूयात.
चुकीच्या शूजमुळे पायांना, घोट्याला किंवा गुडघ्याला दुखापत होऊ शकते.
चालण्यापूर्वी किमान ५ ते १० मिनिटे हलके वॉर्म-अप करणे आवश्यक आहे.
चालताना खाली बघून किंवा वाकून चालू नका, यामुळे मान आणि पाठीवर ताण येऊ शकतो.
जास्त वेळ चालणार असाल तर रिकाम्या पोटी चालू नका.
चालण्यापूर्वी आणि चालताना पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे
चालताना किंवा लगेच नंतर भरभर पाणी पिणे टाळा. यामुळे पोटात दुखू शकते.