Anuradha Vipat
२०२५ मध्ये विवाह पंचमी २५ नोव्हेंबर, मंगळवार रोजी आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला साजरा केला जातो
विवाह पंचमी या दिवशी भगवान राम आणि माता सीतेचा विवाह झाला होता.
धार्मिक दृष्ट्या हा अत्यंत शुभ दिवस असूनही अनेक लोक आणि विशेषतः महाराष्ट्रात या दिवशी लग्न करणे टाळतात.
विवाह पंचमी या दिवशी लग्न न करणे यामागे धार्मिक कारण नसून भावनिक आणि सांस्कृतिक मान्यता आहेत.
असे मानले जाते की राम आणि सीतेच्या लग्नानंतर लगेचच त्यांच्या वैवाहिक जीवनात अनेक कठीण प्रसंगांना आणि संकटांना सामोरे जावे लागले
या दिवशी राम-सीतेची पूजा आणि विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात असे मानले जाते.