Anuradha Vipat
काळा लसूण हा पांढऱ्या लसणापासून वेगळा असतो आणि तो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
अनेकदा लोकांना काळ्या लसणाबद्दल माहिती नसते. काळा लसूण हा साधारण ६०°C ते ९०°C आणि आर्द्रतेमध्ये काही महिने 'फर्मेन्टेशन' प्रक्रियेतून तयार केला जातो.
काळ्या लसणाला पांढऱ्या लसणासारखा उग्र किंवा तिखट वास आणि चव नसते.
काळ्या लसणाची चव सौम्य, गोडसर असते आणि ती बाल्समिक व्हिनेगर, चिंच किंवा सुक्या मेव्यासारखी लागते.
काळ्या लसणाच्या पाकळ्या मऊ आणि चिकट होतात ज्यामुळे त्या सहजपणे खाल्ल्या जातात.
काळ्या लसणामध्ये पांढऱ्या लसणापेक्षा अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण खूप जास्त असते.
काळा लसूण कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.