Anuradha Vipat
मानसिक ताण , चिंता आणि नैराश्य येण्यामागे जीवनसत्त्वांची कमतरता कारणीभूत असू शकते.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असल्यास सतत चिडचिड होणे, मनात नकारात्मक विचार येणे आणि नैराश्याची लक्षणे दिसू शकतात.
व्हिटॅमिन डी-३ च्या कमतरतेमुळे विनाकारण भीती वाटणे आणि मानसिक ताण वाढणे अशा समस्या उद्भवतात.
सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे किंवा आहारात कमतरता असल्यास 'मूड स्विंग्स' होऊ शकतात.
बी ६ च्या कमतरतेमुळे गोंधळल्यासारखे होणे किंवा अस्वस्थता वाढू शकते.
व्हिटॅमिन बी १ च्या अभावामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो आणि मानसिक थकवा जाणवतो.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीर ताण सहन करण्यास असमर्थ ठरते आणि अस्वस्थता वाढते.