Anuradha Vipat
शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता भासल्यास प्रामुख्याने रक्ताची कमतरता आणि मज्जासंस्थेवर मोठा परिणाम होतो.
शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होते, ज्यामुळे अवयवांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि सतत गळून गेल्यासारखे वाटते.
रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक तजेलदारपणा जाऊन ती फिकट किंवा पिवळसर दिसू लागते.
थोडे जरी काम केले किंवा पायऱ्या चढल्या तरी लगेच धाप लागते आणि डोळ्यांसमोर अंधारी येते.
नसांवरील संरक्षक आवरण कमकुवत झाल्यामुळे हातापायांमध्ये सुया टोचल्यासारखे वाटणे किंवा झिणझिण्या येणे असा त्रास होतो.
लहान-सहान गोष्टी लक्षात न राहणे, कामात एकाग्रता न होणे किंवा गोंधळ उडणे यासारख्या समस्या उद्भवतात.
विनाकारण चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे आणि मानसिक ताण वाढणे ही देखील बी १२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत.