Anuradha Vipat
आज तुमच्या योजनांना गती मिळेल. तुमची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास वाढीस लागेल.
व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी नवीन आणि फायदेशीर संधी उपलब्ध होतील. आर्थिक उलाढाल वाढेल.
हाती घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश लाभेल आणि मनोबल मजबूत राहील.
घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. आध्यात्मिक प्रगती होईल आणि प्रकृती उत्तम राहील.
कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्व क्षमतेने लोक प्रभावित होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल आणि मुलांचे प्रश्न मार्गी लागतील.
प्रवास सुखकर होतील आणि एखादी महत्त्वाची किंवा आनंददायी वार्ता समजेल.
कार्यक्षेत्रात उत्तम सुसंधी, प्रसिद्धी आणि धनलाभ होण्याचे योग आहेत. भावंडांशी संबंध सुधारतील.
नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीचा योग्य सन्मान होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
दैनंदिन कामे सहज मार्गी लागतील, मन आनंदी आणि आशावादी राहील. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे.
ज्ञानाची साधना आणि बौद्धिक कामांमध्ये प्रगती होईल. तुमची निर्णयक्षमता वाढेल.
जुने विवाह जमण्याचे किंवा नवीन कार्याचे आयोजन करण्याचे योग आहेत. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अत्यंत शुभ आहे. नोकरीत पदोन्नती किंवा कामात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.