Mahesh Gaikwad
मुस्लिम धर्मियांमध्ये सौदी अरेबियाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पवित्र तीर्थ मक्केच्या हज यात्रेसाठी जगभारातील मुस्लिम बांधव येथे येत असतात.
मक्कासाठी प्रसिध्द असणाऱ्या सौदी अरेबियामध्ये असे काही प्राणी आहेत, जे सौदीशिवाय इतर कुठे आढळत नाहीत.
हौबारा बस्टर्ड नावाचा पक्षी फक्त सौदीमध्ये आढळतो. महाराष्ट्रात आढळणाऱ्या माळढोक पक्ष्याप्रमाणेच ही पक्षी दिसतो.
अरबी लाल कोल्हा हा छोट्या प्रजातीचा कोल्हा आहे. अंगावरील लाल केसांमुळे याला अरबी लाल कोल्हा असेही म्हणतात.
सँड गजेल हा सौदीच्या वाळवंटामध्ये राहणारी हरणाची प्रजाती आहे. याचे पाय नाजून आणि काटक असतात.
अरबी ऑरिक्स हा सौदी अरेबियाच्या वाळवंटात आढळणारा हरणासारखा दिसणारा मोठा शाकाहारी प्रजातीचा प्राणी आहे.
न्युबियन आयबेक्स ही डोंगर कड्यांवर चढणारी शेळीची प्रजाती आहे. जी सौदी अरेबियाच्या डोंगराळ भागात आढळते.
अरबी उंट ज्याला वाळवंटातील जहाज असेही म्हटले जाते. ही सौदी अरेबियातील प्रतिष्ठीत प्रजाती असून त्याचे सौदीच्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे.