World Veterinary Day 2024 : जनावरांसह मानसाच्या चांगल्या आरोग्यासाठी झटणारे पशुवैद्यक

Team Agrowon

आज जागतिक पशुवैद्यक दिन. पशुवैद्यक संघटनेमार्फत दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या शनिवारी ‘जागतिक पशुवैद्यक दिन’ साजरा केला जातो. सन २००० पासून याला सुरुवात झाली.

World Veterinary Day | Agrowon

प्राणी जगताचे आरोग्य आणि कल्याणासाठी जागतिक पशुवैद्यक संघटनेची स्थापना करण्यात आली.

World Veterinary Day | Agrowon

जागतिक हवामान बदल आणि वाढत चाललेल्या प्राणिजन्य आजाराची संख्या याचा विचार केला तर निश्‍चितपणे पशुवैद्यकांचे महत्त्व अधोरेखित होते.

World Veterinary Day | Agrowon

या वर्षी 'Veterinarians are the essential health workers' अर्थात, पशुवैद्यक हे मानवी आरोग्य जपण्यासाठी महत्त्वाचे आरोग्य कर्मचारी आहेत, अशी थीम निवडलेली आहे.

World Veterinary Day | Agrowon

पशुवैद्यकीय शास्त्र हे केवळ प्राण्यांच्या आरोग्य व कल्याणासाठी नसून मानव जातीच्या शारीरिक मानसिक आणि सामाजिक कल्याणासाठी देखील योगदान देणारे आहे, हे आज या निमित्ताने चर्चिले जाणार आहे.

World Veterinary Day | Agrowon

अनेक वेळा पशुवैद्यकांचे काम हे समाजाच्या दृष्टीने थोडे दुर्लक्षित राहते असे म्हणायला वाव आहे.

World Veterinary Day | Agrowon

पशुवैद्यकीय शास्त्र हे मानवी आरोग्याचे मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण करत असते आणि ते त्यांच्या व्यवस्थापनाचा आवश्यक भागही आहे.

World Veterinary Day | Agrowon

World Veterinary Day जरी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतले नसले तरी सार्वजनिक आरोग्य, अन्नसुरक्षा योग्य पद्धतीने पुरवण्यासाठी ते मदत करत असतात, हे मान्य करायलाच हवे.

World Veterinary Day | Agrowon

Goat Milk : गायीच्या दुधापेक्षा शेळीचे दूध जास्त पोषक कसे?

आणखी पाहा