Goat Milk : गायीच्या दुधापेक्षा शेळीचे दूध जास्त पोषक कसे?

Team Agrowon

गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधामध्ये ऊर्जा, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात तर कर्बोदकामधील महत्त्वाचा घटक म्हणजे लॅक्टोज कमी प्रमाणात असते.

Goat Milk | Agrowon

शेळीच्या दुधात जीवनसत्त्व अ, क, ड तसेच थायमिन, नायसिन, पायरीडॉक्सिन, कोलीन ही जीवनसत्त्वे जास्त प्रमाणात असतात. तसेच कॅल्शिअम, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, सोडिअम ही खनिजेही गायीच्या दुधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतात.

Goat Milk | Agrowon

स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात असली तर त्याचे सूक्ष्मकण असल्यामुळे दुधामध्ये ते एकजीव होतात. गायीच्या दुधाला स्निग्ध पदार्थयुक्त मलई येते तसे शेळीच्या दुधाचे होत नाही.

Goat Milk | Agrowon

शेळीच्या दुधात प्रथिने जास्त प्रमाणात असले तरी त्यांची एका विशिष्ट प्रकारची शृंखला असल्यामुळे ते पचनासाठी सोपे असतात.

Goat Milk | Agrowon

गायीचे दुधातील प्रथिने पचायला आठ ते दहा तास लागतात तर शेळीचे दूध फक्त २० ते २५ मिनिटांमध्ये पचते.

Goat Milk | Agrowon

अनेकांना गायीच्या दुधामुळे पोटाचा त्रास होतो. गायीच्या दुधाचे पचन चांगले होत नसल्यामुळे त्यांना दूध वर्ज्य करावे लागते. अर्थात, हे सर्व आजच्या संकरित गायीच्या दुधाचे परिणाम आहेत, ज्याला आपण ए-१ दूध म्हणतो आणि आपल्याकडील स्थानिक गायीच्या दुधाला ए-२ दूध म्हणतो.

Goat Milk | Agrowon

इम्युनोग्लोबिन हा घटक मानवी दुधापेक्षा शेळीच्या दुधात जास्त प्रमाणात असतो. याचमुळे आईच्या दुधानंतर लहान मुलांना शेळीचे दूध द्यावे, असे आपले पूर्वज सांगत होते.

Goat Milk | Agrowon

शेळीच्या दुधामध्ये प्रथिने जास्त असून ते ए-२ बिटा केसिन, बिटा ग्लोब्युलिन केसिन या प्रकारात असून, त्यातील बिटा केसिन हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो.

Goat Milk | Agrowon
आणखी पाहा..