Mahesh Gaikwad
कामाच्या ताणातून आलेला थकवा घालवण्यासाठी बरेच जण चहा पितात. चहा पिणे तसं सगळ्यांनाच आवडते.
चहाची लोकप्रियता केवळ भारतातच नाही तर जगभरात आहे.
अनेकांना चहामध्ये आलं आणि इतर मसाले घातलेला चहा प्यायला आवडते. पण चहामध्ये विलायची घालून पिणे शरिरासाठी चांगले असते का?
जर तुम्ही चहामध्ये विलायची घातली तर चहाचा स्वाद वाढतो. याशिवाय चहात विलायची घालायचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
विलायाची घातलेला चहा पिल्यास तोंडाची श्वासांची दुर्गंधी येत नाही.
शरिराच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठीही विलायचीवाला चहा फायदेशीर असतो.
घसा खवखवत असल्यास विलायची घातलेला चहा पिल्यास आराम मिळतो.