Mahesh Gaikwad
शेतीमातीशी असलेले आपले नाते दृढ करण्याचा आणि काळ्या आईचे ऋण व्यक्त करण्याचा सण म्हणजे वेळा अमावस्या.
वेळ अमावस्या म्हणजे कृषी संस्कृतीचा आदर्श आणि बळीराजासाठी नवचैतन्य निर्माण करणारा उत्सव. यालाच दर्शवेळा अमावस्या, येळवस असेही म्हटले जाते.
महाराष्ट्रातील शेतकरी बांधव शेतात सहकुटुंब जाऊन काळ्या आईची मनोभावे पूजा करतात.
अनेक शेतकरी वेळा अमावस्येला सहकुटुंब बैलगाडीतून शेतात जातात. शेतात प्रतिकात्मक सहा दगडांची पाच पांडव आणि द्रौपदी म्हणून विधीवत पूजा करतात.
या सहा दगडांना काव आणि चुना लावून चेहर्यासारखे रंगवले जाते. कडब्याच्या पेंढ्यांची वर एक तात्पुरती खोप केली जाते.
पूजा झाल्यानंतर सहकुटुंब आंबील, बाजरीची भाकरी,गहू गुळाची खीर,भज्जी जेवणाचा आस्वाद घेतात.
शेती आणि शेतकऱ्यांवर येणाऱ्या नैसर्गिक संकटांपासून शेतीचे रक्षण करून बळीराजा समृध्द व्हावा, अशी प्रार्थना शेतकरी बांधव करतात.
वेळ अमावस्येचा सण महराष्ट्रातील सीमावर्ती भागात प्रामुख्याने लातूर, सोलापूर, धाराशीव, बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील शेतकरी साजरा करतात.