Anuradha Vipat
रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास शरीरात थकवा, चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवतो.
शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लोह आणि फॉलिक ॲसिडयुक्त पालेभाज्या खाणे अत्यंत आवश्यक आहे.
पालकामध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते. तसेच यात असणारे विटामिन 'सी' शरीराला लोह शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे हिमोग्लोबिन वेगाने वाढते.
मेथीमध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे रक्तातील लाल रक्तपेशी वाढतात.
लाल माठामध्ये लोहाचा उत्तम स्त्रोत असतो. नियमित लाल माठ खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता खूप लवकर भरून निघते.
कोथिंबीर आणि पुदिन्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. चटणी किंवा रसाच्या स्वरूपात याचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
शेवग्याच्या पानात पालकापेक्षाही जास्त लोह असते. याची पाने वाळवून त्याची पावडर किंवा भाजी खाल्ल्याने हिमोग्लोबिन झपाट्याने वाढते.