Anuradha Vipat
वैचारिक गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने महत्त्वाचे निर्णय घेताना शांत राहा. खर्चाचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.
हातात घेतलेल्या कामांमध्ये नक्कीच यश मिळेल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील.
स्वतःच्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा इतरांसोबत गैरसमज होऊ शकतात. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे
व्यापारात धनलाभ होण्याचे उत्तम योग असून उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. घरातील वातावरण उत्साही राहील.
सरकारी कामांमध्ये आणि धनाच्या बाबतीत आज मोठे यश लाभेल. विरोधकांपासून थोडे सावध राहा.
दीर्घकाळापासून रेंगाळलेल्या गुंतागुंतीच्या समस्या सुटतील आणि नशिबाची उत्तम साथ लाभेल.
आरोग्याची किरकोळ तक्रार जाणवू शकते, त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या. घाईने निर्णय घेणे टाळा.
भागीदारीच्या व्यवसायात उत्तम सुयश आणि मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपले मत सौम्यपणे मांडा.
कार्यात यश मिळेल आणि घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील. वाहने चालवताना मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
आज मन थोडे चिंतातुर आणि द्विधा अवस्थेत राहू शकते, त्यामुळे घाईत निर्णय घेऊ नका.
सामाजिक क्षेत्रात तुमचा इतरांवर चांगला प्रभाव राहील, पण कामात वाढीव मेहनत करावी लागेल. तब्येतीची आणि आरोग्याची आज विशेष काळजी घ्या.
आज मन धार्मिक, आध्यात्मिक कार्यात आणि करमणुकीत जास्त गुंतलेले असेल.