Anuradha Vipat
काही भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरल्याने त्यांची चव बदलू शकते .
आल्याची उग्र चव दुधी भोपळाची मूळ चव पूर्णपणे बदलून टाकते आणि ती चवीला चांगली लागत नाही.
गोड खीर, हलवा बनवताना आल्याची पेस्ट वापरल्यास पदार्थाला एक तिखट चव येते.
पांढऱ्या ग्रेव्हीच्या भाज्यामध्ये आल्याची पेस्ट वापरल्यास ग्रेव्हीची चव आणि रंग दोन्ही बदलू शकते.
दोडक्याची चव गोडसर आणि सौम्य असते. आल्यामुळे त्याची चव उग्र होते आणि भाजी कडवट लागू शकते.
पालक, मेथी किंवा इतर पालेभाज्यांचे सॅलड बनवताना आल्याची कच्ची पेस्ट वापरू नये.
सी-फूडमध्ये आल्याची पेस्ट वापरल्यास माशांचा नैसर्गिक, नाजूक सुगंध आणि चव झाकली जाते.