Anuradha Vipat
उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी योग्य भाज्यांची निवड करणे आवश्यक असते.
काही भाज्यांचा स्वभाव अतिशय उष्ण असतो, तर काही भाज्या उन्हाळ्यात लवकर खराब होतात.
पालेभाज्यांचा स्वभाव मुळात उष्ण असतो. उन्हाळ्यात कडक उष्णतेमुळे या भाज्यांवर जंतू आणि बॅक्टेरिया वेगाने वाढतात.
वांग्यामध्ये नैसर्गिकरित्या उष्णता वाढवणारे गुणधर्म असतात. उन्हाळ्यात जास्त वांगे खाल्ल्याने शरीरातील पित्तदोष वाढतो.
या भाज्या पचायला जड असतात. उन्हाळ्यात आपली पचनसंस्था आधीच मंदावलेली असते.
हॉटेलमधील किंवा घरातील जास्त गरम मसाला, आले आणि लसूण वापरून बनवलेल्या रस्सा भाज्या खाणे पूर्णपणे टाळा.
हॉटेल्स किंवा रस्त्यावरील गाड्यांवर उघड्यावर ठेवलेले सॅलड खाऊ नका.