Anuradha Vipat
भाज्या फ्रिजमध्ये न ठेवता देखील काही सोप्या घरगुती ट्रिक्स वापरून तुम्ही त्या जास्त काळ ताज्या आणि फ्रेश ठेवू शकता.
पालेभाज्यांची मुळे ग्लास किंवा भांड्यातील पाण्यात बुडवून ठेवा. दिवसातून एकदा पाणी बदला.
भाज्या स्वच्छ करून ओल्या सुती कापडात घट्ट गुंडाळून ठेवा.
पालेभाज्या सुकवून एका हवा बंद प्लास्टिक पिशवीत ठेवा.
बटाटे आणि कांदे नेहमी कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा.
कांदा आणि बटाटा कधीही एकत्र ठेवू नका. कांद्यामुळे बटाटे लवकर खराब होतात.
लिंबू पाण्यात बुडवून ठेवल्यास जास्त काळ रसदार राहतात