Anuradha Vipat
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस हा घरात लक्ष्मीच्या आगमनाचा आणि सकारात्मक ऊर्जेचा पाया रचणारा दिवस मानला जातो.
वास्तू शास्त्रानुसार, या दिवशी गोमातेच्या पूजनासोबतच घरात काही विशेष उपाय केले, तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.
वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उंबरठ्याची पूजा करून दिवा लावावा. यामुळे बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही.
वसुबारसच्या संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्वच्छतेची काळजी घ्या. तेथे पाण्याचा तांब्या ठेवा किंवा एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करा.
वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घराच्या ईशान्य किंवा पूर्व दिशेला 'कामधेनू' गाईची चांदीची, तांब्याची किंवा पितळेची मूर्ती स्थापित करावी.
वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शेणापासून बनवलेल्या कोरड्या गोवऱ्यांवर गुग्गुळ, कापूर आणि कडुनिंबाची पाने टाकून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा.
दारासमोर गाय आणि वासरू यांच्या पावलांची रांगोळी काढावी. ही पावले बाहेरून घराच्या आत येताना दाखवावीत.