Govatsa Dwadashi : गोवत्स द्वादशीला गायीला 'या' गोष्टी खायला घाला, ९ ग्रहांचे सर्व दोष क्षणात होतील दूर

Anuradha Vipat

प्राचीन परंपरा

दिवाळीची सुरुवात करणाऱ्या वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशीला गोमातेची आणि वासराची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे.

Govatsa Dwadashi | agrowon

ग्रहदोष

ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी गाईची सेवा केल्याने आणि तिला विशिष्ट गोष्टी खायला घातल्याने कुंडलीतील अनेक मोठे ग्रहदोष त्वरित दूर होतात.

Govatsa Dwadashi | agrowon

तूप आणि गूळ

जर तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील, लग्न जमण्यात अडचणी येत असतील किंवा पैशांची तंगी असेल, तर गोवत्स द्वादशीला गाईला गव्हाच्या पोळीसोबत गूळ आणि तूप खायला घालावे.

Govatsa Dwadashi | agrowon

मसूर डाळ आणि गुळ

ज्या लोकांवर कर्जाचा मोठा डोंगर आहे किंवा कुंडलीत अंगारक (मंगळ) दोष आहे, त्यांनी या दिवशी गाईला भिजवलेली मसूर डाळ आणि गूळ खायला द्यावा.

Govatsa Dwadashi | Agrowon

गहू किंवा बाजरी

नोकरीत यश मिळत नसेल किंवा वरिष्ठांशी वाद होत असतील, तर तुमचा सूर्य ग्रह कमजोर असू शकतो. यासाठी गोवत्स द्वादशीला गाईला गव्हाची भाकरी किंवा बाजरी आणि गुळ खायला द्यावा.

Govatsa Dwadashi | Agrowon

हिरवा चारा

बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा कारक असलेल्या 'बुध' ग्रहाची अकृपा असेल, तर या दिवशी गाईला ताजा हिरवा चारा किंवा सुका मेव्याचे लाडू खायला घालावेत.

Govatsa Dwadashi | Agrowon

तांदूळ आणि दूध

मनात सतत नकारात्मक विचार येत असतील किंवा मानसिक तणाव असेल, तर गोवत्स द्वादशीला गाईला तांदळाची खीर किंवा खडीसाखर आणि दूध अर्पण करावे.

Govatsa Dwadashi | agrowon

Horoscope 4 November 2026 : आजच्या दिवशी अचानक धनलाभाचे उत्तम योग आहेत

Horoscope 4 November 2026 | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...