Anuradha Vipat
घरी प्रत्यक्ष गाय उपलब्ध नसेल तरीही आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि शास्त्रोक्त रीतीने घरच्या घरी वसुबारस पूजा करू शकता.
वसुबारस पूजेचा मुख्य उद्देश गोमाते प्रति कृतज्ञता व्यक्त करणे हा असतो
यंदा गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३३ ते रात्री ८:१० या प्रदोष काळात खालील स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने पूजा संपन्न करा.
मातीची, धातूची गाय-वासराची मूर्ती किंवा छानसा फोटो, चौरंग किंवा पाट आणि त्यावर अंथरण्यासाठी लाल किंवा पिवळे वस्त्र, हळद, कुंकू, अक्षता, चंदन आणि गुलाल, फुलांचा हार आणि सुटी फुले, विड्याची पाने आणि सुपारी, दिवा, अगरबत्ती आणि कापूर, औक्षणासाठी ताट (निरांजन, अक्षता, कुंकू), विशेष नैवेद्य: भिजवलेले मूग, हरभरे, गूळ आणि बाजरीची भाकरी किंवा पुरणपोळी.
घराच्या ईशान्य कोपऱ्यात सुंदर रांगोळी काढा. पाटावर किंवा चौरंगावर लाल किंवा पिवळे कापड अंथरा. कापडावर थोडे तांदूळ ठेवून त्यावर गाय-वासराची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा. गोमातेच्या आणि वासराच्या कपाळावर गंध, हळद आणि कुंकू लावा. पूजेमध्ये गुलालाचा वापर आवर्जून करा. त्यानंतर अक्षता वाहून त्यांचे ध्यान करा.
गाय आणि वासराला सुवासिक फुलांचा हार घाला किंवा चरणाशी फुले अर्पण करा. अगरबत्ती आणि दिवा लावून संपूर्ण जागेला सुवासिक बनवा. गाईला अतिशय प्रिय असलेला नैवेद्य म्हणजे भिजवलेले हरभरे आणि गूळ अर्पण करा.
ताटात निरांजन लावून गाय आणि वासराची मनोभावे आरती करा. सुख, समृद्धी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी गोमातेकडे प्रार्थना करा. शक्य असल्यास मूर्तीभोवती किंवा स्वतःभोवती गोल फिरून गोमातेला साष्टांग नमस्कार करा.