Coconut Ladoo : दिवाळी स्पेशल: बिना खवा, बिना पाक; फक्त १० मिनिटांत बनवा ओल्या नारळाचे मऊ लाडू

Anuradha Vipat

अचूक रेसिपी

दिवाळी फराळामध्ये प्रत्येकाच्या घरी आवर्जून बनवले जाणारे मऊ, रसरशीत ओल्या नारळाचे लाडू बनवण्याची सर्वात सोपी आणि अचूक रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Coconut Ladoo | agrowon

परफेक्ट लाडू

या पद्धतीमध्ये आपण मावा किंवा खवा न वापरता घरच्या साहित्यात परफेक्ट लाडू बनवणार आहोत.

Coconut Ladoo | agrowon

अचूक प्रमाण

ओल्या नारळाचा खिस,साखर, दूध, मिल्क पावडर, साजूक तूप, वेलची पूड, ड्रायफ्रूट्सचे काप.

Coconut Ladoo | agrowon

कृती

साजूक तूप गरम करा. त्यात ड्रायफ्रूट्सचे काप हलके सोनेरी रंगावर परतून एका वाटीत काढून घ्या. ओल्या नारळाचा चव घाला. मंद आचेवर २ ते ३ मिनिटे हलके परतून घ्या.

Coconut Ladoo | agrowon

दूध आणि साखर मिसळणे

परतून घेतलेल्या नारळामध्ये अर्धी वाटी दूध आणि १ वाटी साखर घाला. मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण हळूहळू घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्या.

Coconut Ladoo | agrowon

मिल्क पावडर आणि वेलची

मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्यात ४ मोठे चमचे मिल्क पावडर घाला आणि गुठळ्या न होऊ देता चांगले मिक्स करा. यामध्ये परतलेले ड्रायफ्रूट्स आणि १ छोटा चमचा वेलची पूड घाला. हे मिश्रण कढई सोडू लागेपर्यंत आणि त्याचा मऊ गोळा होईपर्यंत परता.

Coconut Ladoo | agrowon

लाडू वळणे

मिश्रण हाताला सोसेल इतके कोमट असतानाच, हाताला थोडे तूप लावून आवडीच्या आकारात मऊ मऊ लाडू वळून घ्या. तुमचे दिवाळी स्पेशल मऊ आणि रसरशीत ओल्या नारळाचे लाडू तयार आहेत!

Coconut Ladoo | agrowon

Sweet Chirote Recipe : जुन्या पद्धतीचे खमंग साट्याचे चिरोटे: या खास ट्रिकने बनवा जिभेवर विरघळणारे खुसखुशीत चिरोटे!

Sweet Chirote Recipe | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...