Anuradha Vipat
वसुबारस हा दिवाळीचा एक पवित्र दिवस मानला जातो. आजपासून दिवाळीला सुरुवात झाली आहे.
आज गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते.आज आपण पाहूयात वसुबारस पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते.
गायी आणि वासरू ,हळद, कुंकू, अक्षता (तांदूळ), फुले, पाणी, निरांजन किंवा समई, धूप, गुलाल, अगरबत्ती.
उडदाचे वडे, गव्हाचे पदार्थ, पुरण-वरणाचा स्वयंपाक, मोड आलेली मूग आणि मटकी.
गाईला घालण्यासाठी वस्त्र किंवा माळा, गाईला खाऊ घालण्यासाठी गोड घास किंवा गवत.
वसूबारसला पूजेपूर्वी गाय आणि वासराला स्वच्छ धुऊन त्यांचे पूजन केले जाते
गाय उपलब्ध नसल्यास तुम्ही घरात कामधेनूची मूर्ती किंवा फोटोची पूजा करतात.