Anuradha Vipat
आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. आजच्या दिवसाला वसूबारस असे म्हणतात. आज आपण पाहूयात वसुबारसच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत.
आजच्या वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घातले पाहिजेत परिधान करा.
आजच्या दिवशी घरात गाय आणि वासरू असल्यास त्यांना स्वच्छ अंघोळ घालावी.
आजच्या दिवशी गायीच्या मूर्तीची किंवा फोटोची पूजा करावी
आजच्या दिवशी गायीला आणि तिच्या वासराला हळद-कुंकू, अक्षता आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्यात.
आजच्या दिवशी पुरणपोळी करून त्याचा नैवेद्य गायीला आणि वासराला दाखवा.
आजच्या दिवशी तुळशीजवळ आणि दाराबाहेर पणत्या लावाव्यात.