Anuradha Vipat
दिवाळी या प्रकाशाच्या उत्सवाची सुरुवात 'वसुबारस' या सणाने होते.
वर्ष २०२६ मध्ये वसुबारस गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी साजरी केली जाईल.
हा दिवस आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.
वसुबारस तारीख: गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६
द्वादशी तिथी प्रारंभ: ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३५ वाजता
द्वादशी तिथी समाप्ती: ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता
पूजेचा शुभ मुहूर्त (प्रदोष काळ): सायंकाळी ५:३३ ते रात्री ८:१० पर्यंत
शेतीप्रधान देशात शेतकऱ्याला मदत करणाऱ्या आणि मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या पशुधनाप्रति आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे.
धार्मिक मान्यतेनुसार, वसुबारसच्या दिवशी गाईची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी नांदते.
पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी 'नंदा' नावाच्या धेनूला उद्देशून हा गोवत्स द्वादशीचा सण साजरा केला जातो