Anuradha Vipat
घरात सुख-समृद्धी नांदावी आणि पैशाची आवक सतत सुरू राहावी असे वाटत असेल तर शास्त्रानुसार काही प्रभावी उपाय खालीलप्रमाणे आहेत.
रोज सकाळी दरवाजासमोर सडा टाकून रांगोळी काढावी. दरवाजावर हळद-कुंकवाचे 'स्वस्तिक' काढावे आणि आंब्याच्या पानांचे तोरण लावावे.
दररोज सायंकाळी तुळशीपाशी आणि घराच्या मुख्य चौकटीवर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा.
घरातील उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवावी. या ठिकाणी कुबेराची मूर्ती किंवा 'धनलक्ष्मी'चा फोटो लावल्याने आर्थिक प्रगती होते.
ईशान्य कोपऱ्यात एका तांब्याच्या कलशात स्वच्छ पाणी भरून ठेवा. हे पाणी दररोज बदलावे.
देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.
रोज सकाळी पक्ष्यांना धान्य किंवा मुंग्यांना पिठामध्ये साखर मिसळून खाऊ घाला.