Anuradha Vipat
मानसशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तींना खूप जास्त राग येतो, त्यांच्या स्वभावात काही विशिष्ट गुण किंवा वैशिष्ट्ये दडलेली असतात.
जास्त राग येणाऱ्या व्यक्ती अनेकदा मनाने खूप हळव्या आणि संवेदनशील असतात.
अशा व्यक्ती सहसा मनात काहीही ठेवत नाहीत. त्यांना जे वाटते ते तोंडावर बोलून दाखवतात.
ज्या लोकांना प्रत्येक गोष्ट 'परफेक्ट' लागते, त्यांना काम मनासारखे न झाल्यास चटकन राग येतो.
जर त्यांच्यासमोर काही चुकीचे घडत असेल किंवा कोणी खोटे बोलत असेल, तर त्या आपला संयम गमावतात.
आपल्या माणसांनी काही चुकीचे करू नये किंवा त्यांचे नुकसान होऊ नये, या काळजीपोटी तो राग व्यक्त होतो.
अशा व्यक्ती इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात. जेव्हा समोरची व्यक्ती त्यांच्या अपेक्षांना उतरत नाही तेव्हा निराशेचे रूपांतर रागात होते.