Anuradha Vipat
घरामध्ये दररोज कापूर जाळणे हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर वास्तू शास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीनेही अत्यंत फायदेशीर मानले जाते.
कापुराच्या पवित्र सुगंधामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकतेचा संचार होतो.
कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक शक्ती बाहेर पडते आणि घरात सुख-शांतता नांदते.
रोज सकाळी आणि संध्याकाळी देवघरात कापूर जाळल्याने घरातील मोठे वास्तू दोष दूर होतात.
वास्तू शास्त्रानुसार, घरात नियमित कापूर जाळल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, ज्यामुळे पैशांची चणचण दूर होते
रात्री झोपण्यापूर्वी घराच्या दक्षिण दिशेला कापूर जाळल्याने अचानक येणारी संकटे आणि अपघातांची शक्यता कमी होते
कापूर जाळल्यामुळे हवेतील हानिकारक जिवाणू, विषाणू आणि जंतू नष्ट होतात. यामुळे घरातील हवा शुद्ध आणि ताजी राहते.