Anuradha Vipat
घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये आणि सुख-समृद्धी नांदावी यासाठी अनेक जण मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचा फोटो किंवा मूर्ती लावतात.
जर बाहेरून मूर्ती लावली असेल, तर अगदी त्याच भिंतीच्या मागच्या बाजूने हुबेहूब दुसरी मूर्ती किंवा फोटो लावा. यामुळे दोन्ही गणपतींची पाठ एकमेकांना जोडली जाईल आणि घराच्या आत दारिद्र्य येणार नाही. याला 'द्विमुखी गणपती' म्हणतात.
मुख्य दारावर नेहमी डाव्या बाजूला सोंड असलेला (वाममुखी) गणपती किंवा फोटो लावावा. डाव्या सोंडेचा गणपती हा शांतता, आनंद आणि गृहस्थाश्रमासाठी शुभ मानला जातो.
जर दार दक्षिणमुखी असेल, तर मातीची किंवा सिमेंटची मूर्ती लावण्याऐवजी पांढऱ्या रंगाच्या गणपतीचा फोटो किंवा चांदीची, तांब्याची धातूची मूर्ती लावावी.
मुख्य दाराच्या चौकटीवर लावलेल्या गणपतीचा आकार फार मोठा नसावा. तसेच तो अतिशय उंचावर किंवा जमिनीच्या अगदी जवळ लावू नये.
मुख्य दारावरील गणपती रोज साफ करावा. जर मूर्ती किंवा फोटो खराब झाला असेल, तर तो सन्मानपूर्वक वाहत्या पाण्यात विसर्जित करून नवीन मूर्ती स्थापित करावी.
मुख्य दारावर गणपतीसोबत 'शुभ' आणि 'लाभ' किंवा 'स्वस्तिक' चे चिन्ह लावणे अत्यंत मंगलकारी मानले जाते.