Yoga For Better Sleep : रात्री बेडवर करा 'ही' ५ सोपी योगासने; एका मिनिटात येईल शांत आणि गाढ झोप!

Anuradha Vipat

प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग

व्यस्त दिनचर्येनंतर शरीराला आणि मनाला पूर्ण विश्रांती देण्यासाठी योगासने हा एक अत्यंत प्रभावी आणि नैसर्गिक मार्ग आहे.

Yoga For Better Sleep | Agrowon

झोपेचे संप्रेरक

योग केल्याने शरीरातील ताणतणाव कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते आणि झोपेचे संप्रेरक सक्रिय होते.

Yoga For Better Sleep | Agrowon

शवासन

सर्व आसनांमध्ये हे सर्वात सोपे आणि विश्रांती देणारे आसन आहे. हे आसन संपूर्ण शरीराचा थकवा दूर करून मेंदूला शांत करते, ज्यामुळे लगेच गाढ झोप लागते.

Yoga For Better Sleep | Agrowon

बालासन

हे आसन शरीरातील मानसिक आणि शारीरिक ताण झटक्यात कमी करते. यामुळे मज्जासंस्था शांत होते आणि रात्री मनात येणारे नकारात्मक किंवा अनावश्यक विचार थांबतात.

Yoga For Better Sleep | Agrowon

विपरीता करणी

दिवसभर उभे राहून किंवा बसून पायांवर आलेला ताण या आसनाने दूर होतो. यामुळे थकलेले पाय रिलॅक्स होतात आणि शांत झोप येते.

Yoga For Better Sleep | Agrowon

बद्ध कोनासन

बेडवर झोपूनही तुम्ही हे आसन सहज करू शकता. हे आसन मांड्या आणि कंबर येथील ताण कमी करते. यामुळे शरीराला आराम मिळून श्वसनक्रिया संथ आणि खोल होते.

Yoga For Better Sleep | Agrowon

सुप्त मत्स्येंद्रासन

पाठीचा कणा रिलॅक्स करण्यासाठी हे सर्वोत्तम आसन आहे. पाठीच्या कण्याला मिळणाऱ्या हलक्या पिळाळामुळे दिवसभराचा थकवा आणि पाठदुखी दूर होते, जी बऱ्याचदा झोप न येण्याचे कारण असते.

Yoga For Better Sleep | Agrowon

Sleeplessness Causes : रात्री कुशी बदलून थकलात? जाणून घ्या झोप न येण्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय!

Sleeplessness Causes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...