Team Agrowon
निसर्गाचा लहरीपणा, त्याचबरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस त्यामुळे वातावरणात होणारा बदल याचा परिणाम हंगामी पिकांसोबतच फळबागांमध्येही दिसतोय.
अवकाळी पाऊस पडल्यापासून ढगाळ वातावरण आणि थंडीच गायब झाल्याने आंब्याला मोहर येत नाही. या वातावरणामुळे आंब्यावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय.
कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी कराव्या लागणाऱ्या फवारण्यामुळे साहजीकच आंबा बागायतदारांच्या खर्चात वाढ होतेय. सर्वसाधारणपने डिसेंबर जानेवारीत मोहर येतो.
कडाक्याची थंडी सुरु झाल्यानंतर आंबा झाडांना जानेवारीत चांगला मोहर येईल. ही मोहर येण्याची प्रक्रिया फेब्रुवारीत देखील सुरु राहील. उन्हाळ्यात तापमान खुप जास्त राहिल्यास उष्मांक जास्त मिळून जूनमध्ये आंबा मिळेल.
काही ठिकाणी आंबा बागांमध्ये मोहराची गळ झालेली आहे. ढगाळ वातावरणामुळे मोहराची गळ होते. ही मोहराची गळ जर थांबवायची असेल तर थायोमिथोक्झाम २५ डब्लू जी ०.५ ग्रॅम अधिक हेक्झाकोनॅझोल ४ टक्के डल्बू पी २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याशिवाय बुरशीनाशके आणि किटकनाशकाची शिफारशीनूसार फवारणी केल्यास बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो.
काही बांगामध्ये वेळेआधीच बागेत मोहर आलेला आहे. ज्या आंबा बागयतदारांनी बागेत पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केला त्या बांगांमध्ये लवकर मोहर आलेला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्या नूसार १० वर्ष वयाच्या बागेमध्ये पॅक्लोब्युट्राझोलचा वापर केल्यास मोहर येण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होते.
काही आंबा बागेत वर्षाआड फळधारणा दिसून येते. आंब्याच्या काही जाती या वर्षाआड फळ देतात. दरवर्षी फळधारणा होण्यासाठी बागेतील फळांची विरळणी करावी. कमी प्रमाणात फळे झाडावर ठेवावीत त्यामुळे दरवर्षी बागा मोहरतात.