Swarali Pawar
शास्त्रज्ञ आणि कृषी विद्यापीठांनी उशिरा पेरणीसाठी खास वाण विकसित केले आहेत. हे वाण कमी कालावधीत तयार होतात आणि रोगप्रतिकारक्षम असतात. त्यामुळे उत्पादन कमी होत नाही.
मध्यम आकाराचे दाणे असलेला हा वाण 105–110 दिवसांत तयार होतो. उशिरा पेरणीमध्येही हेक्टरी 20–22 क्विंटल उत्पादन देतो. कंबाईन हार्वेस्टरने काढणीस उपयुक्त.
पिवळसर टपोरे दाणे असलेला वाण. बागायतीत 90–95 दिवस आणि जिरायतीत 105–110 दिवसांत तयार होतो. उत्पादन क्षमता 20–22 क्विंटल/हेक्टर. मर रोगावर प्रतिकारक.
दुष्काळ आणि कमी पाण्यासह शेतीला योग्य. बागायतीत 85–90 दिवस आणि जिरायतीत 105–110 दिवसांत तयार. उशिरा पेरणी क्षमता 16–18 क्विंटल/हेक्टर.
2021 मध्ये प्रसिद्ध. पिवळसर टपोरे दाणे. 95–105 दिवसांत तयार होते. सरासरी उत्पादन 20 क्विंटल/हेक्टर. मर रोग प्रतिकारक आणि जिरायत शेतीसाठी खास.
हे सर्व वाण कृषी सेवा केंद्र, महाबीज आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. प्रमाणित आणि स्वच्छ बियाणे निवडणे महत्त्वाचे.
उशिरा पेरणीसाठी शेतकऱ्यांनी १५ डिसेंबरच्या आत पेरणी पूर्ण करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वेळ पाळली तर उत्पादन टिकून राहते.
पेरणी उशिरा झाली म्हणून हरभरा टाळू नका. योग्य वाण निवडला तर उत्पादन कमी होत नाही. उशिरा पेरणी — योग्य बीज निवड — भरघोस उत्पादन!