sandeep Shirguppe
सध्या सोशल मीडियावर कोणता व्हिडीओ किंवा इमेज व्हायरल होईल याचा नेम नाही, काही सामाजीक संदेश देणारे तर काही हसवणारे असतात.
असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ताडोबा अभयारण्यातील नयनतारा या वाघिनीने समाजाला जागं करणारा संदेश दिलाय.
महाराष्ट्रातील चंद्रपूरमधील ताडोबा हे वाघ प्रकल्प वाघांचा दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. इथे लाखो पर्यटक येत असतात.
पर्यटक आपली तहान भागवण्यासाठी पाण्याची बॉटल घेऊन येत असतात परंतु त्याची ते योग्य विल्हेवाट लावत नाहीत.
माणसांप्रमाणेच प्राण्यामध्येही तेवढीच समज असते अस आपण अनेकवेळा ऐकतोय. हेच या वाघीणीने आपल्या कृतीतून सिद्ध केलं आहे.
जंगल सफारी करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी प्लास्टिकची पाण्याची बॉटल जांभूळडोह सिमेंट बंधाऱ्यातील फेकून दिली होती.
नयनतारा तिथे आली आणि तिने पाण्यातून ती बॉटल काढली आणि ती घेऊन ऐटीत निघून गेली.
जणू काही तिने आपल्या घरातील घाण साफ केल्यासारखा तिचा रुबाब होता.
हा व्हिडीओ @Deep Kathikar यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. याला लाखो लाइक्स आणि प्रतिक्रिया आल्या आहेत.